About us

केल्याने होत आहे रे , आधि केलेचि पाहिजे

समाज / सामान गरजेपोटी एकत्र आलेला व्यक्तिंचा समूह. ढोबळमानाने समाजाची हि व्याख्या केली जात असली तरी आजच्या काळात मात्र सामाजातील व्यक्तीच्या गरजा अन विचार परस्परविरोधी दिसून येतात, तरीही तो समाज बनतो. कारण समाज हि आचार - विचार अन तत्व, नीती मूल्याची एक लक्ष्मणरेखा असते. जीवन व्यवहाराला बेबंध होऊ न देण्यासाठी संयम व मर्यादाच एक कुंपण घालण्याची व्यवस्था म्हणूनही समाजकडे आपणास पाहता येतील. सामाज हि व्यवस्था इतकी पक्की आहि कि , शक्यतो तिच्या मर्यादांचे उल्लंघन करण्यास कोणी धजावत नाही. काळाचा ओघात समाजाचे रिंगणही व्यापक झाले. असंख्य जुण्या रूढी, परंपरा, चालीरीती गळून पडल्या. काही तोडून फेकाव्या लागल्या ते फेकायचे काम ज्या महापुरुषांनी केले त्याना प्रारंभी समाजाने वाळीत टाकले पण नंतर मात्र याच समाजाने त्यांना देवत्व, संतत्व बहाल केले. काळाचा महिमा अगाध म्हणतात तो असा.

जाती -धर्मानुसार समाजाचीही अनेक शकले झाली असती तरी या छोट्या समाजांनी आपापली अस्मिता जपत व्यापक समाजात स्वतःला सामील करून घेतले आहे. देशमुख, मराठा समाज देखील असाच बरासचा, कट्टर बदलांना थेट न भिडणारा, रूढी-परंपरांचा अभिमान बाळगणारा, अस्मितेसाठी कुठल्याही थराला जाणारा. आज देखील विविध सामाज्यामंध्ये जेवढे सामाजिक स्तिथत्यांतर झाले, त्या मानाने देशमुख मराठा समाजात तुलनेने कमीच झाले. देशमुखीची मिजास अजून गेलेली नाही. इतर समाज भराभर पुढे निघून गेले, पण देशमुख आपल्या अस्मितेलाच कवटाळून बसलेले दिसतात. लवचिकता असणे म्हणजे स्वाभिमान गहाण टाकला असे होत नाही, हे कुणी तरी केव्हातरी समाजाच्या धुरीणांना पटवून द्यायला हवे, आरक्षण धोरणामुळे सरकारी नोकऱ्या दुरापास्त झाल्या, उच्च शिक्षणासाठी त्याचा फटका बसला . पाण्याचा अभावी शेतजमीनींची वाट लागली प्रतिष्ठा आणि डामडौल टिकवण्यासाठी कर्जबाजारी पणा वाढला अशा दुष्टचक्रात अडकलेल्या समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी एका भक्कम अशा संघटनांची गरज निर्माण झाली . या गरजेपोटी देशमुख, मराठा समाज उन्नती मंडळाची स्थापना झाली. विदर्भ मराठवाड्यात अशा प्रकारचे संघटनांने एक दिशा अन गती घेतली असले तरी उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्हात समाज तास विस्कळीत होता. सुख-दुःखाचा निमित्ताने एकत्र येण्या पलीकडे समाजाची धाव नव्हती. शहरामध्ये तर शेजारी राहणारा, आपला समाज बांधव आहे, याचीही बऱ्याचदा कल्पना नसते, अश्यास्तिथीत उत्तम संबंधाची कल्पना करवत नाही. समाजाला एकत्र आणायचे प्रयत्न या ठिकाणी झालेच नाही असे नाही, विदर्भ, खान्देश च्या मंडळींनी येथे एकमेकाला धरून राहण्याच्या गरजेपोटी का होईना पण आपल्या समाज बांधवांचे संघटन केलेले दिसून येते. या शिवाय वधू - वर सूचक मंडळाच्या माध्यमातूनही काही प्रमाणात ठिकठिकाणी मर्यादित स्वरूपात काम झाले, ते देखील कामापुरतेच ठरले.

समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्यापक विचाराने एकत्र यायची गरज निर्माण झाली. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून समाज बांधव प्रयत्नाला लागले आहेत , समाजाची बांधणी ती तशी अवघड बाब. त्यात आपली ऐट अन तोऱ्या साठी प्रसिध्द असणारा देशमुख मराठा समाजाची बांधणी करणे, म्हणजे महाकर्म कठीण बाब पण सुदैवाने एक्कत्र येण्याची गरज बहुसंख्याना वाटत असल्याने माहौल जमायला सुरवात झाली. देशमुखांकडे सत्ता आहे, देशमुख मोठे आहेत, ते सारे खरे असले तरी हि सधनता आता बोटावर मोजण्याइतका लोकांपुरती मर्यादित झाली असून बहुसंख्य लोकांना जगण्यासाठी पडेल ते काम करावे लागते आहे. जातीच्या अस्मितेमुळे अनेकांना अशीकामी करणे देखील अवघड बनल्याने गावात नको म्हूणन स्तलांतर करण्याकडे ओढा आहे. समाज भांडावांपुढे अशी अनेक संकटे आहेत. या संकटांचा मुकाबला एकटयाने करणे शक्य नाहीच म्हणूनच आधुनिक विचार घेऊन समाजला एकत्र आणण्याची नितांत गरज बनली आहे. समाज संघटनांसाठी ठिकठिकाणी ज्या बैठका झाल्या त्यातून समाजची हि भळभळती जखमच बाहेर आली, आपल्याच बांधवांकडून नाडले गेलेले पिचलेले अनेक बांधव या वेळी भेटले परखडपणे बोलले याचा आनंद वाटला. आजही केवळ समाजाच्या अस्मितेसाठी विवाह सोहळाच्या खर्च अनेक बांधवांना पेलवत नसतानाहि करावा लागतो. हुंडा, मानपान हि वर समाजाला लागलेली कीड आहे. शतकानुशतके पोसलेली हि कीड एका दिवसात नष्ट होणार नाही. त्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागेल पण कुठेतरी सुरवात झाली पाहिजे, ज्यांनी अशी सुरवात केली, असेल त्यांचे कौतुक करावे लागेल. जेणे करून इतराना त्याची प्रेरणा मिळेल. अन हे सारे समाजाच्या व्यास पिठावर झाले तरच शक्य होईल.

विधवा पुनर्विवाह समाजात शक्य मानल्या जात नाही. अशाने आपणच आपल्या एका भगिनीला जगणे नाकारतो, याचा विचार कोणी करत नाही. पुरुषांनी चार लग्ने केली तरी ती देशमुखांची शान समजली जाते. पण देशमुखांच्या महिलांना पुनर्विवाहाचा हक्क नाकारला जातो. खरे तर असा कायदा व नियम नाही. समाजाने पण असे ठरवल्याचं कुठे आढळत नाही. हि अघोषित अन अलिखित परंपरा पुढे रूढी बनून गेली. बदलत्या जमान्यात समाजाला या मुद्द्दाचाही विचार करावा लागणार आहे.

समाजातील गुणवंत पाल्याचें कौतुक करणे, त्यातुन त्याना प्रोसाहन देणे असाही मंडळाचा उद्देश आहे महिला मंडळ स्थापण करून त्याद्वारे विविध उपक्रम राबवण्याचा देखील मानस आहे. समाजाच्या नावाचे वा मालकीचे मानलं कार्यालय नाही सर्व समाजानी आपल्या समाज बांधवांसाठी हि सुविधा निर्माण केली आहे. पण देशमुख मराठा समाज एकसंघ नसल्याने अशी वस्तू उभी राहू शकत नाही. मंगल कार्यालय झाल्यास समाजतील गोरगरीब बांधवाचा फार मोठा भार हलका होणार आहे. अशा असंख्य उदात भावना घेऊन मंडळाची स्थापना केली आहे. मंडळात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असा प्रयत्न आहे. त्यासाठी सभासदाची यादी बनवली जात आहे.

हि यादी संगणकीकृत केली जाईल एक प्रकारे समाजाची शिरगणती होईल. त्यातून समाजाची लोकसंख्या , शिक्षणाचे प्रमाण शैक्षणीक-आर्थिक स्थर याचा अभ्यासकांनाही हि संशोधनासाठी उपयोग होऊ शकेल, काम अवघड आहे , याची सर्वांना जाणीव आहे. पण केल्याने होत आहे रे , आधि केले चि पाहिजे या उक्तीप्रमाणे मंडळाचा पदाधिकायांनी आधी काम करायाचे ठरवले आहे. समाजबांधवांनी त्यास प्रतिसाद द्यावा हीच प्रार्थना !

शैलेंद्र तनपुरे
देशमुख मराठा समाज, नाशिक जिल्हा

नाव गोत्र नाव गोत्र
निंबाळकर (देशमुख ) काश्यप ढगे काश्यप
मोरे भारद्वाज ठाकरे वशिष्ट
काळे वत्स कडलग कश्यप
मुकुंद आत्रेय मोरे गौतम
निकम पाराशर काळे भारद्वाज
काळे वत्स तुंगार कश्यप
धोंगडे सिंंधू दौंड वशिष्ट
कदम- भारद्वाज शिसोदे कौशिक
आहेर भारद्वाज चव्हाण कश्यप
सावंत दुर्वास तावडे विश्वावसु
हंडे भारद्वाज तनपुरे अत्री
सुर्वे वशिष्ट थोरात वशिष्ट
मोहिते भाजी वाघचौरे भारद्वाज
शिर्के शांतील्य पिसाळ कौशिक
काकडे कोडीण्य कोठावळे काशा
उदार वशिष्ट गायकवाड भारद्वाज
पवार वशिष्ट सोळंके भारद्वाज
गेंडाम भारद्वाज घोरपडे कौशिक
गाडे(गायकवाड) भारद्वाज महाले भारद्वाज
काळे भारद्वाज गरुड कश्यप
जाधव अत्री /अत्रेय घायवत भारद्वाज
मोजाड अगस्ती मोजाड अगस्ती
शिंदे कौंडिण्य खंडागळे वशिष्ट
सोनवणे भारद्वाज दळवी अत्री
सोमवंशी अत्री शेळके भारद्वाज
इंगवले भारद्वाज दळवी अत्री
इंगळे भारद्वाज सोमवंशी भारद्वाज
निकुंभ वशिष्ट निकम वशिष्ट
भोसले (कुळी) कौशिक चव्हाण कश्यप
शितोळे कश्यप शेलार भारद्वाज
धुमाळ दुर्वास दाभाडे शौनक
जगदाळे कपील कोठावळे काश्यप
सिसोदे कौशिक उदार वशिष्ट
गाढे भारद्वाज इनामदार भार्गव

(उपलब्द्ध माहितीनुसार गोत्रे देण्यात आलेली असून बदलही होऊ शकतो, क्षमस्व !)

देशमूख मराठा समाज कार्य व उध्दीष्टे

आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक या क्षेत्रांत समाज बांधवांचा विकास साधणे

  • समाजाचा सर्वागीण विकास

समाज बांधवानी वधू-वर सूची तयार करणे
वधु-वर मेळावा यांचे आयोजन करणे
सामूहिक विवाह आयोजन करणे

  • वधू-वर सूचक समिती

आरोग्यविषयक शिविरे आयोजित करणे
रक्तदान व वैध्यकिय आयोजित करून वैध्यकियदृष्ट्या आर्थिक व इतर मदत उपलब्ध करून घेणे

  • आरोग्यविषयक कार्यक्रम

समाजातील शैक्षणिकदृष्ट्या यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सन्मान करणे
शैक्षणिक मार्गदर्शन वर्ग (शिबिरे) आयोजित करणे
समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मदत करणे
व्यक्तिगत विकास साधणे, शैक्षणिक संस्था स्थापन करणे

  • शैक्षणिक उपक्रम

विविध क्षेत्रात सन्माननीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा गुणगौरव करणे
महिला मंडळ स्थापन करून त्याद्वारे विविध सांस्कृतिक, धार्मिक व सामाजि कार्य राबविणे
समाजातील युवकांचे मंडळ स्थापन करणे
समाजातील अनिष्ठ रूढी व चालिरीती याबाबत प्रबोधन करणे

  • सांस्कृतिक कार्यक्रम

समाजाचे मंगल कार्यालय व सभागृह बांधणे
समाजातील दानशूर व्यक्तिकडुन निधी उभारून समाजोपयोगी उपक्रम राबविणे
समाजातील बेरोजगार युवकांना व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून व्यक्तिगत विकास साधणे
ग्राहक मंडळ, पतसंस्था, कल्याणनिधी ट्रस्ट स्थापन करणे. समाजाचे संघटन मजबूत करून शासनदरबारी सरकारी स्तरावर विविध प्रश्नांची सोडवणूक करणे
समाज बांधवांच्या सुख - दुःखात सहभाग घेणे

  • इतर कार्यक्रम